Ad will apear here
Next
मी कॉपीराईटर आणि पत्रकार!
सेक्स, बलात्कारापासून ते सामाजिक विषयांवर मी लिहित असून महाराष्ट्रातील आणि परदेशातील विविध ग्रुप्सने पसंती दिली आहे. अनेकांनी माझा व्यवसाय विचारला आहे.

मी कॉपीराईटर आहे. पूर्णवेळ... पॉन्डस्, व्होडाफोन, एअरटेल, गोदरेज, सिप्ला, पार्ले, रिलायंस, लावासा, वेस्टर्न युनियन, ICICI, इतर अनेक बँक्स, मुंबई पोलीस अश्या अनेकांच्या जाहिराती लिहिल्या आहेत. अंदाजे ३०० पेक्षा जास्त प्रोडक्ट्सच्या TV, प्रेस इत्यादी भरपूर जाहिराती मी लिहिल्या आहेत.

मी एड्स, कॅन्सरसंबंधी खूप मोठं कॅम्पेन केलं होतं. एका विशेष कामगिरीचा मी इथे उल्लेख करतो. लोकसभा निवडणुकीला मी एकाचवेळी BJP, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जाहिराती लिहिल्या होत्या. अब कि बार... (BJP), हर हात शक्ती (कॉंग्रेस) च्या प्रचारात सगळ्या मराठी जाहिराती माझ्या होत्या. श्री नरेंद्र मोदी ह्यांनी लोकसभा निवडणुकी आधी महाराष्ट्रातील गावागावात काही पत्रे पाठवली होती. ती सर्व पत्रे मी मराठीत लिहिली होती.

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यावर एक दिवशी मला अचानक राष्ट्रवादीच्या जाहिरातींसाठी बोलावण्यात आलं. फक्त २० दिवसात राष्ट्रवादीच्या जाहिराती लिहिल्या, रातोरात सेट लावून शूट करून घेतल्या (डिरेक्टर : श्रीकांत केकरे, कमी सेकंदात ऑडीओ-व्हिजुअल मधून खूप काही सांगतो). मग आपोआपच विधानसभा निवडणुकांचं काम आलं. ह्यावेळी मी कोणाच्या जाहिराती केल्या हे विसरलेल बरं!... ह्यात २ आमदार आहेत. त्यातला एक बहुमताने जिंकला आहे. एक अॅडवायझर असल्यामुळे माझ्यासाठी सर्व पक्ष क्लाएन्टस् होते. माझ्यासोबत इतर भाषांचे कॉपीराईटर होते. आम्ही दिल्लीत बसून अनेक पक्षांच्या जाहिराती लिहित असू आणि लिहिलेल्या मजकुरावर हसत असू. वास्तविक पॉलिटिकल पार्टीसाठी मी लिहित नसे; पण ते क्लाएन्ट बनून आल्यामुळे लिहिलं.

मी सोबत जोडलेल्या फोटोमध्ये श्री अमिताभ बच्चन ह्यांच्या सोबत आहे. त्यांना घेवून मी एक मराठी जाहिरात केली होती. ते आणि मी BR स्टुडीओ मध्ये गेलो होतो. मी त्यांना मराठी संवाद म्हणून दाखवले आणि त्यांच्या आवाजात जाहिरात केली. त्यावेळी त्यांनी मला "च" चा उच्चार करायला सांगितला. ते हिंदी "च" म्हणत होते आणि मी मराठी "च" सांगत होतो. शेवटी त्यांनी मला विचारलं- "निरेन... ये लोणचं वाला 'च' बोलना हैं क्या?" मी करेक्ट म्हटल्यावर त्यांनी मराठी "च" चा अचूक उच्चार केला. त्यांना मराठी "लोणचं" शब्द माहीत आहे!!

1

काही दिवसांपूर्वी मी नाना पाटेकर, माधुरी दिक्षित ह्यांच्याकडून मराठी संवाद डब करून घेतले (मूळ जाहिरात हिंदी मध्ये होती.)

असे अनेक कलाकार नेहमी सोबत असतात.

मी माझ्या करियरची सुरुवात "सामना"मधून केली होती. मी सायन्सचा विद्यार्थी होतो आणि स्वर्गीय अभय परांजपे (वादळवाट आणि इतर मालिकांचे लेखक) त्यावेळी "सामना"मध्ये उपसंपादक होते. त्यांनी मला लिहायला सांगितलं आणि पत्रकारितेची काहीही माहिती नसूनही मी चक्क पत्रकार झालो. तेव्हापासून विविध विषय लिहित राहिलो. मी सेक्स आणि बलात्काराबद्दल काही लेख लिहिले. एका मोठ्या दैनिकाने नाकारले. त्यांना सिनेमा, सिरीयल किंवा इतर साधे लेख हवे होते. ते लिहून मी कंटाळलो होतो. सेक्स, बलात्काराची मूळ कारणे ह्यावरील लेख कोणताही वृत्तपत्र छापत नव्हतं.

मग मी ते लेख छोट्या भागात फेसबुक वर टाकले.

कॉपीराईटिंग, डबिंग, शूट हा माझा मूळ व्यवसाय आहे; पण फेसबुक पत्रकारिता सुरू करून मी नवा प्रयोग केला. त्याला अनेकांनी चांगली साथ दिली. महाराष्ट्र जशी कार्यकर्त्यांची भूमी आहे, तशी नवे विचार स्वीकारणाऱ्यांचीही भूमी आहे.

माझं फेसबुक वर "सामजिक जीवन ते सेक्स" नावचं पेज आहे. आपण वाचाल अशी अपेक्षा.

- निरेन आपटे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DYAFCO
Similar Posts
‘आजच्या जगात प्रायव्हसी हा भ्रम आहे’ सध्या व्हॉट्सअॅप आणि फेसबुक यावरून ‘डेटा प्रायव्हसी’चा विषय खूपच चर्चेत आला आहे. ब्लडलाइन या कादंबरीमध्ये सिडने शेल्डन म्हणतो, ‘आजच्या जगात प्रायव्हसी हा भ्रम आहे. प्रत्येक नागरिक हा कम्प्युटरसमोर उघडा पडलेला आहे.’
ऑनलाईन मैत्री.. 👬👭👫 ''Hi...'' फेसबुक वॉल स्क्रोल करत असताना आभाच्या मेसेंजरवर हिरवा दिवा लुकलूकला. सहसा कोणाला रिप्लाय न करणाऱ्या आभाने त्या दिवशी मात्र का कोण जाणे त्याला पटकन रिप्लाय दिला. फेसबुकवर बोलता बोलता दोघांमधली मैत्री हळूहळू वाढत गेली आणि मग ‘व्हॉट्स अँपवर असशीलच तू…’ या थोड्याशा जुन्या झालेल्या नंबर मागायच्या
डबिंगच्या गमतीजमती आमची रिहर्सल चालली होती; पण अमिताभ ‘च’चा उच्चार हिंदी ‘च’सारखा करत होते. मग मी मराठी ‘च’ म्हणून दाखवत होतो आणि ते फॉलो करत होते. शेवटी अचानक थांबले आणि त्यांनी मला विचारलं, ‘‘लोणचं’वाला ‘च’ बोलना हैं क्या?’ मी स्तंभित झालो. त्यांना लोणचं शब्द माहीत होता!! मी होकार दिल्यावर त्यांनी मराठी ‘च’चा अचूक
अव्यक्त आपल्या सगळ्यांच्या मनात निरनिराळे विचार चालू असतात. काही मनाला आनंद देणारे तर काही दुःख देणारे. आपल्या मनात चाललेल्या निरनिराळ्या गोष्टी आपण आपल्या जवळच्या व्यक्तीशी शेअर करत असतो. असे काही मित्र-मैत्रिणी असतात ज्यांच्याशी आपण मागचा पुढचा विचार न करता अगदी बिनधासपणे बोलू शकतो...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language